उबदार स्पर्श त्यातून जाणवणारी मऊ मुलायम माया आणि एकात एक गुंफलेले नक्षीदार रंग… शिवाय एक विशिष्ट दर्प भुतकाळाचा ..! ही झाली परंपरागत गोधडी मनात गुंतलेले भुतकाळाचे सोनेरी कप्पे, उमलणारे नक्षीदार आकार लयदार आकृती आणि तजेलदार आकर्षक रंगाची गुंफण यातून भुतकाळ सांगणाऱ्या या पारंपारीक गोधडीला रामचंद्र समकालिन कलाविश्वात फुलवतो आणि तिची उबदार माया कॅनव्हासवर गोंदवून चिरंतन करतो. त्याची ही चित्रे पाहील्यावर विसरून जाता येत नाहीत तर ती आपल्या मनावर उबदार रंगाची गुंफण पांघरतात.

 

वर्षा कोणताही पसारा न मांडता अत्यंत साधेपणाने थेट अलंकरणाच्या भाषेत स्त्रीयांची प्रतिमा लयदारपणे साकारत जाते.. तिचे विषय स्त्रीच्या सुंदर आकृतीभोवती गुंफलेले असतात. पण त्यामुळेच तिची चित्रे थेट सुंदरतेची परिभाषा मांडतात.. व पाहणाऱ्याच्या डोळ्यांना सुखावण्याचे काम अगदी सहजतेने करतात. अलंकृत स्त्री आकृत्यांची सहजता हा वर्षाच्या चित्रांचा विषय आहे तर समकालीन विषय गोधडीच्या सौंदर्याची पारंपारीकता जपत मनाची पकड घेणारी रंगाची उबदार गुंफण करणे हा रामचंद्रचा आशय आहे

आशुतोष आपटे

 


Warmth of the touch that elaborates tender illusion and intermingled the colours along with the past memories, are the features of an orthodox quilt.

Entangled state of mind with golden memories of the past, blossoming shapes, rhythmic figures and resplendent and splendid interwoven of colours, denoting the past are the other features of a quilt. Ramchandra, beautifully blossoms this quilt in the contemporary world of colours and makes it perpetual on the canvas with the same warmth and past memories. When we look at his paintings, they influence us eternally.

Varsha very simply, ornamentally and harmoniously produces the images of a woman. Her topics are amalgamated around the images of a lady. Because of this, her paintings directly arrange terminology of charm. Her paintings satisfy the viewers.

Ornamental paintings of the women is Varsha’s subject matter whereas beautifully blossoming of a quilt in the retained, traditional and contemporary world of colours is the content of Ramchandra’s paintings.

– Ashutosh Apte